श्री अंबिका योग कुटीरचा हीरक महोत्सव

परमपुज्य हठयोगी निकम गुरुजी हे 1950 सालापासून विनामूल्य योगशास्त्र शिकवत असत. त्यांनी 1965मध्ये गुढी पाडव्याच्या दिवशी श्री अंबिका योग कुटीर, ठाणे या संस्थेची स्थापना केली. ही संस्था गेली 60 वर्षे देश-विदेशात विनामूल्य योग शास्त्र शिकवत आहे. या संस्थेच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन यंदाच्या गुढी पाडव्याच्या दिवशी केले आहे.

श्री अंबिका योग कुटीरच्या दहिसर पश्चिम शाखेची सुरुवात ऑगस्ट 1989मध्ये झाली. या शाखेचे संचालक संजय लडगे यांनी परमपुज्य हठयोगी निकम गुरुजींकडून योग शिक्षण घेऊन ‘योग शिक्षक’ ही उपाधी गुढी पाडवा 1986 या दिवशी प्राप्त केली. संजय लडगे, दहिसर शाखेच्या पहिल्या वर्गापासून सेवा देत आहेत. या शाखेच्या 119व्या वर्गाचा समारोप समारंभ 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता समाज कल्याण केंद्र, तरे मार्ग, दहिसर पश्चिम येथे होणार आहे. सर्व नागरिकांना या समारंभात उपस्थित राहण्याचे तसेच 120व्या वर्गात प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे. संपर्क – संचालक संजय लडगे (7021200781), संचालिका कविता कदम (9769967396).