श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णी, सुनील शेट्टी, एन. राजम यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार

दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार अभिनेत्री श्रद्धा कपूर, सोनाली पुलकर्णी, अभिनेता सुनील शेट्टी, गायिका रीवा राठोड यांना जाहीर झाला आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे यांच्यासह शास्त्राrय संगीत क्षेत्रातील दोन प्रतिष्ठत महिलांनाही पुरस्पृत केले जाणार आहे. दिग्गज व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम यांनाही पुरस्कार जाहीर झाला.

साहित्य क्षेत्रासाठी श्रीपाल सबनीस यांना वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान केला जाईल. सामाजिक बांधीलकी जपणाऱया ‘आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन’ला सन्मानित केले जाणार आहे. त्याचबरोबर ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला वर्षातील सर्वोत्पृष्ट नाटक म्हणून पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्कारांची घोषणा करताना पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, ‘‘दरवर्षी आम्ही अशा व्यक्तींचा सन्मान करतो, ज्यांनी गुरू दीनानाथजींच्या समर्पण, उत्पृष्टता आणि सेवेच्या भावनेला मूर्त रूप दिले आहे. हा उत्सव केवळ भूतकाळाला श्रद्धांजली नाही तर वर्तमान आणि भविष्याला दिलेली एक मशाल आहे,’ ’ असे ते म्हणाले.

‘सारं काही अभिजात’ संगीतमय कार्यक्रम

या वेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतील ‘सारं काही अभिजात’ कार्यक्रम सादर होईल. विभावरी आपटे-जोशी, मधुरा दातार यांच्यासह अनेक कलावंत आपली कला सादर करतील. त्याचसोबत विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर यांच्या अनोख्या व्याख्यानाचेही या वेळी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान आणि हृदयेश आर्टस् यांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे.