श्रद्धा कपूरने खरेदी केली 3 कोटींची लक्झरी कार

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने लॅम्बोर्गिनीच्या खरेदीनंतर आणखी एक लक्झरी एमपीव्ही कार खरेदी केली. लेक्सस एलएम 350 एच असे या कारचे नाव असून या कारची किंमत तब्बल 3 कोटी रुपये आहे. ही कर शानदार कन्फर्ट, अॅडवान्स्ड टेक्नॉलॉजी आणि प्रीमियम डिझाईनसाठी ओळखली जाते. बॉलीवूड कलाकारांमध्ये ही कार पसंतीची कार आहे. रणवीर कपूरसह अनेक मोठय़ा कलाकारांकडे ही कार आहे. या कारमध्ये एलएम 350 एचमध्ये 2.5 लिटरचे पेट्रोल इंजिन दिले आहे. मल्टिपल एअरबॅग, ट्रक्शन कंट्रोलसह खूप सारे सेफ्टी फिचर्स या कारमध्ये आहेत.