पुणे विद्यापीठाची अधिसभा स्थगित; सदस्यांमध्ये बाचाबाची

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेच्या बैठकीत अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. चिखल फेकीमुळे नाशिक जिह्यातील अधिसभा सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य एकमेकांवर धावले. सुरक्षा रक्षकांना मध्यस्थी करून हा वाद मिटवावा लागला. त्यामुळे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना अधिसभेचे कामकाज स्थगित करावे लागले.