
शिवसेना भायखळा विधानसभा तसेच कुलस्वामिनी उद्योगी स्त्री एकत्रीकरण व महिला विकास संस्था संयुक्त विद्यमाने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर…खेळ खेळू पैठणीचा’ तसेच हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 5 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता फेरबंदर येथील म्हाडा मिल संकुल मैदानात हा कार्यक्रम रंगणार आहे. विजेत्या महिलांना सोन्याची नथ, सेमी पैठणी, चांदीची फ्रेम, गिफ्ट व्हाऊचर अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत, अशी माहिती उपविभाग संघटक किर्ती शिंदे यांनी दिली.
दैवज्ञ समाजाचा रविवारी वधू-वर मेळावा
मुंबई ः अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या महिला विभागातर्फे रविवार 6 एप्रिल रोजी ‘वधू-वर पालक मेळावा’ सिद्धिविनायक सभागृह, महाराष्ट्र हायस्कूल, एन.एम. काळे मार्ग, दादर (पश्चिम) येथे सायं. 4.00 ते रात्री 8.00 वा. या वेळेत आयोजित केला आहे. दैवज्ञ ब्राह्मण ज्ञातीतील इच्छुकांनी त्वरित नाव नोंदणी करावी असे आवाहन सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर व महिला विभाग प्रमुख गीता वैद्य (9920661999) यांनी केले आहे.