लक्षवेधक – स्टॉक इन्फ्लुएन्सरला दणका

अनेक जण सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर असल्याचा दावा करतात आणि स्टॉक मार्पेट टीप्स देतात तसेच स्टॉकच्या शिफारसी करतात. यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होते. अशा इन्फ्लुएन्सरवर सेबीने कडक कारवाई करून दंड ठोठावला. सेबी म्हणजेच सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने 2024 मध्ये अशा अनेक लोकांवर कारवाई केली, ज्यांनी गुंतवणूकदारांची दिशाभूल केली. सेबीने 15 हजारांपेक्षा अधिक वेबसाईट्सवर बंदी घातली. यामध्ये अनेक फिन इन्फ्लुएन्सर आहेत.

एनएसईच्या सुट्टय़ा जारी

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणजे एनएसईने नवीन वर्ष 2025 च्या सुट्टय़ांचे पॅलेंडर जाहीर केले. वर्षभरात एकूण 14 दिवस बाजार बंद राहणार आहे.  2025 ची पहिली सुट्टी 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या निमित्ताने आहे. प्रजासत्ताक दिन, रामनवमी, बकरी ईद आणि मोहरम या प्रमुख सणांना सुट्टी असली तरी शनिवार किंवा रविवारी येत असल्याने या दिवशी वेगळी सुट्टी दिली जाणार नाही. 14 मार्च रोजी होळी आणि 31 मार्च रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त शेअर बाजार बंद राहील.

दक्षिण कोरियात दुखवटा

दक्षिण कोरियातील विमान अपघातानंतर कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष चोई संग मोक यांनी देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. यासोबतच विमान पंपनीच्या सर्व यंत्रणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. रविवारी बँकॉकहून येणारे जेजू एअरचे बोईंग 737 -800 विमान युआन विमानतळावर उतरत होते, परंतु, गीअरमध्ये बिघाड झाल्यामुळे विमानाची चाके उघडली नाही. बेली लँडिंगच्या प्रयत्नात विमान व्रॅश झाले आणि 179 जणांचा मृत्यू झाला.

बुलेट ट्रेन@450 किमी

चीनने नुकतीच अतिवेगवान बुलेट ट्रेनची चाचणी घेतली. चाचणीवेळी या रेल्वेगाडीने ताशी तब्बल 450 किलोमीटर प्रतितास इतका वेग गाठला. यामुळे ही बुलेट ट्रेन प्रकारातील सर्वात वेगवान रेलठरल्याचा दावा सरकारी मालकीच्या रेल्वे पंपनीने केला आहे. सीआर-450 असे या बुलेट ट्रेनचे तात्पुरते नाव आहे. चाचणी दरम्यान वेग, इंधनाचा वापर, आवाज आणि ब्रेक लावल्यानंतर थांबण्यास लागणारा वेळ याची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्याचा दावा पंपनीने केला आहे.

हिमाचलमध्ये 340 रस्ते बंद

जम्मूकश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंमध्ये सातत्याने बर्फवृष्टी सुरू असून हिमाचल प्रदेशात तब्बल 340 रस्ते बंद आहेत. जागोजागी तब्बल अडीच फुटांहून अधिक बर्फाचा थर साचला आहे. त्यामुळे मोठय़ा संख्येने पर्यटक अडकून पडले आहेत. कश्मीरमध्ये मोठया प्रमाणावर होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-लेह रस्ता बंद आहे. कश्मीर विद्यापिठाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. जवळपास 1800 गाडया अडकून पडल्या आहेत.

बोलेरोने दोन किमी फरफटत नेले

उत्तर प्रदेशातील संभल येथील भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱयासारखा पसरत आहे. बोलेरो कारने मोटारसायकलला धडक दिली आणि तब्बल दोन किलोमीटर फरफटत नेले. या अपघातात मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर बोलेरो चालकाने पळ काढला. सुखबीर नावाच्या मोटारसायकलस्वाराला स्थानिकांनी अपघातानंतर जवळच्या इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

ताजमहालमध्ये जोरदार हाणामारी

आग्रा येथील प्रसिद्ध ताजमहाल येथे पह्टो काढण्यावरून पर्यटकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. पर्यटकांनी लाथाबुक्क्यांनी परस्परांना मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अनेकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी जोरदार मारामारी सुरू होती. सेंट्रल ट्रकजवळ एक जोडपे पह्टो काढत होते. त्याच वेळी काही युवक तिथे येऊन पह्टो काढू लागले. त्यामुळे वाद वाढला.

तालिबानमध्ये खिडक्यांना बंदी  

 अफगाणिस्तानात तालिबानी सरकार महिलांवर अनेक निर्बंध लावत सुटले आहे. शनिवारी तालिबानने एक आदेश जारी करून निवासी इमारतींमध्ये ज्या ठिकाणी महिला दिसू शकतील अशा ठिकाणी खिडक्या बांधण्यास बंदी घातली. जर अशा खिडक्या आधीच अस्तित्वात असतील तर त्या विटांनी बंद करण्याचे आदेश घरमालकांना देण्यात आले. यामागे अश्लीलता थांबवण्याचे कारण तालिबानींकडून देण्यात आलेय.