लक्षवेधक – स्पेसएक्सने चंद्रावर पाठवले अमेरिका, जपानचे यान

अंतराळ क्षेत्रात आता खासगी कंपन्याही उतरल्या आहेत. स्पेसएक्सने बुधवारी जपान आणि अमेरिकन कंपनीने बनवलेल्या दोन लूनार लँडर्सची जोडी लाँच केली. नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून दोन्ही लँडर रॉकेट सोडण्यात आले. दोन्ही यान चंद्रावर पोचले आहेत. अमेरिकन कंपनीफायर फ्लायच्या यानाचे नावब्लू घोस्टआहे. तर जपानी कंपनीचे नावआईस्पेसआहे. मार्चच्या सुरुवातीला चंद्रावरब्लू घोस्टपोहोचेल. आईस्पेस लँडर जपानी कंपनीने तयार केला असून चंद्रावरील माती गोळा करेल.

बॉलीवूडला रामराम करून घेतला संन्यास

अभिनेत्री  बरखा मदान हिने मॉडेलिंग, ऍक्टिंग सगळं सोडून बौद्ध धर्म स्वीकारला व ती बौद्ध भिक्खूणी बनली आहे. बरखाने अक्षयकुमारसोबत  काम केले होते. अक्षयच्या ‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपटात ती दिसली होती. बरखाने अनेक टीव्ही मालिकांतही काम केलेले आहे.

माणसासारखे दात… विचित्र मासा व्हायरल

सोशल मीडियावर अनेकदा चित्रविचित्र व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या माशाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ब्राझीलच्या पाऊलो मोरेरा याला एक असा मासा मिळालाय, ज्याच्या तोंडात माणसासारखे दात आहेत. माशाला बघून पाऊलो खूप अचंबित झाला आणि त्याने लगेच एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला.

बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती सुरू

बँक ऑफ बडोदामध्ये 1200 हून अधिक पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येणार असून 17 जानेवारी 2025 शेवटची डेडलाईन आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 1267 व्यवस्थापक आणि इतर पदे भरणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 48,480 ते 1,35,020 रुपये असा भरघोस पगार मिळणार आहे.

बांगलादेशात कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बंदी

अभिनेत्री कंगना रनौतच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या 17 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्याआधी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता, परंतु आता या चित्रपटाला भारतीय सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले आहे. बांगलादेशमध्ये ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले आहे.

रजनीकांतच्या ‘जेलर-2’ चा टीझर आला

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर-2’ या आगामी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचा 4 मिनिटांचा प्रोमोसुद्धा प्रदर्शित करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रजनीकांत यांची अनोखी स्टाईल पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात रजनीकांत यांच्याशिवाय जॅकी श्रॉफ आणि साऊथ सुपरस्टार मोहनलाल झळकणार आहे.