लक्षवेधक – मायक्रोसॉफ्टमध्ये 2300 कर्मचाऱ्यांची कपात

मायक्रोसॉफ्टने 2300 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामांवरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी गेल्या आठवडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत येऊन भेट घेतली होती. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना कंपनीने जोरदार दणका दिला आहे.

ब्रिटनी स्पीयर्स  झाली बेघर

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस येथे लागलेल्या जंगलात लागलेल्या आगीने तेथील हॉलीवूड स्टार्सना चांगलेच अडचणीत आणले आहे. तेथे राहणाऱ्या लोकांना घरे सोडावी लागली आहे. यामध्ये अनेक सेलिब्रेटींचाही सहभाग होता. प्रसिद्ध गायिका ब्रिटनी स्पीयर्स हिलादेखील आलिशान बंगला सोडावा लागला.

अल्लू अर्जुन बॉलीवूडच्या वाटेवर

पुष्पा 2 या चित्रपटातून कमाईचे सारे रेकॉर्ड ब्रेक करणारा साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याने नुकतीच चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली. भन्साळी यांच्या जुहू येथील ऑफिसमध्ये भेटण्यासाठी अल्लू आला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अल्लू बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.

आजारपणातही अभिनेत्री समांथाचे कर्कआऊट

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती वर्कआऊट करताना दिसतेय. ‘चिकुनगुनियामधून बरी होत आहे’, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे. यामुळे सांधेदुखी होत असून त्यातून बरे होणे ही मजेशीर गोष्ट असल्याचेही समांथाने म्हटलेय.