अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शक किरण राव यांचा बहुचर्चित चित्रपट ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. या चित्रपटाला अंतिम 15 चित्रपटांमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे, असे अॅपॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अॅण्ड सायन्सेसकडून बुधवारी सांगण्यात आले. चित्रपट बाहेर पडल्याने आम्ही सर्व जण नक्कीच निराश झालो आहोत. या चित्रपटाला ऑस्करच्या शर्यतीत सहभागी होता आले याचा आम्हाला अभिमान आहे, असे या सिनेमाच्या टीमकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. पुढील वर्षी 2 मार्चला ऑस्कर 2025 चा सोहळा रंगणार आहे. याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
एका अंडय़ाची किंमत 21 हजार रुपये
अंडी म्हणजे प्रोटीनचा स्रोत. हिवाळा आला की अंडी खाण्याचे प्रमाण वाढते. अशातच सध्या एका वेगळ्याच अंडय़ाची चर्चा आहे. हे अंडे साधंसुधं नाही. त्यामुळेच ते 21 हजार रुपयांना विकलं गेलंय. अंड स्कॉटलँडच्या सुपरमार्पेटमध्ये सापडले होते. महिलेला त्याचा आकार वेगळा वाटला. तिने अंडे इयुवेंटास फाऊंडेशनला दिले, जिथे 11 डिसेंबर रोजी लिलाव झाला. त्या लिलावात इंग्लंडच्या बर्कशायर येथे राहणारे एड पोनॉल यांना अंडे 200 पाऊंडला खरेदी केले. अंडय़ाचा आकार अंडाकृती नसून गोलाकार आहे. गोल अंडं मिळणे तसे दुर्मीळ. त्यामुळे त्याला ‘वन्स इन अ बिलियन एग’ असे म्हटले जातंय. 2023 साली ऑस्ट्रेलियातही असेच एक अंडं सापडले होते.
जयपूर विमानतळ 32 शहरांशी कनेक्ट
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ आता देशविदेशातील तब्बल 32 एअरपोर्टला कनेक्ट झाले आहे. तसेच वर्षभरात या ठिकाणी विमान प्रवाशांच्या संख्येत जवळपास 68 टक्के वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात जयपूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जवळपास 5.6 लाख होती. यात देशांतर्गत प्रवाशांची संख्या 5.13 लाख आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या 44,012 आहे. ही आकडेवारी नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत जवळपास 17 टक्के अधिक आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर 2024 मध्ये जयपूर एअरपोर्टवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या अनुक्रमे 12 टक्के आणि 19 टक्क्यांनी वाढली आहे.
सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टस्फोन लाँच
देशात सर्वात स्वस्त 5 जी स्मार्टपह्न पोको पंपनीने लाँच केला आहे. पोको इंडियाने पोको सी 75 आणि एम 7 प्रो हे दोन 5 जी पह्न लाँच केले आहे. पोको सी 75 या 5 जी पह्नची किंमत केवळ 7,999 रुपये आहे. या पह्नमध्ये सोनी पॅमेऱ्याचा सेन्सर देण्यात आला आहे. पोको सी 75 या पह्नची विक्री 19 डिसेंबरपासून तर पोको एम 7 प्रो 5 जीची विक्री 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पोको एम 7 प्रो 5जीची सुरुवातीची किंमत 13 हजार 999 रुपये आहे. हे दोन्ही पह्न फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. फोनमध्ये 6.67 इंचाचा जीओएलईडी एफएचडी डिस्ल्पेल, 50 मेगापिक्सलचा सोनी एलवायटी कॅमेरा दिला आहे. डॉल्बी अॅटमॉस सारखे फीचर्स या फोनमध्ये दिली.
3 मुलांची आई पडली पुन्हा प्रेमात
12 वर्षांपूर्वी प्रेमात पडून विवाह करणारी एक महिला पुन्हा एकदा एका तरुणाच्या प्रेमात पडली. या महिलेला तीन मुले आहेत. बायको दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पडल्याने नवऱ्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता बायकोचे त्या तरुणासोबत लग्न लावून दिले. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण बिहारच्या सहरसा जिह्यातील बैजनाथपूर गावातील आहे. 12 वर्षांपूर्वी या महिलेने गावातील एका तरुणासोबत घरच्यांचा विरोध डावलून लग्न केले होते. लग्नानंतर तीन मुले झाली. आयुष्य सुरळीत सुरू असताना महिलेचा गावातील दुसऱ्या एका तरुणावर जीव जडला. महिलेला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले.