अजित पवार गटाचा भायखळा येथील तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्ये प्रकरणी गुन्हे शाखेने आज दिलीप वागसकरला अटक केली. तो मिंधे गटाचा भायखळा येथील पदाधिकारी आहे. सचिन कुर्मी यांची ऑक्टोबर महिन्यात भररस्त्यात हत्या झाली होती. घोडपदेव येथील युनायटेड मिल व्रं. 5च्या मागच्या बाजूला पायी जात असताना तिघांनी त्यांना हेरले आणि सोबत आणलेल्या धारदार शस्त्रांनी वार केले होते. सचिन यांचा जागीच मृत्यू झाला होता. वागसकरला न्यायालयाने 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
सुधीर ढवळे, रोना विल्सनला जामीन
मुंबई – भीमा-कोरेगाव हिंसाचार तसेच एल्गार परिषद प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या सुनील ढवळे व रोना विल्सन यांचा मुंबई उच्च न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला. एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका करतानाच या प्रकरणात अद्याप आरोप निश्चित झालेले नाहीत. येत्या काळात हा खटला सुरू होण्याची अथवा पूर्ण होण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने नोंदवले.
महिलेच्या शरीरयष्टीवर टिप्पणी करणे हा गुन्हाच!
कोची – महिलेच्या शरीरयष्टीवर टिप्पणी करणे हादेखील लैंगिक छळाचा गुन्हाच आहे, असे महत्त्वपूर्ण मत केरळ उच्च न्यायालयाने व्यक्त केले. कार्यालयातील महिलेच्या शरीरयष्टीवर टिप्पणी केल्यानंतर केरळ राज्य विद्युत मंडळाच्या माजी कर्मचाऱयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी संबंधित कर्मचाऱयाने केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली.