थोडक्यात बातम्या: एअरफोर्सची हैदराबादेत हवाहवाई, विमान कर्मचाऱ्यांना मिळाले थकीत वेतन

हैदराबादमधील डंडीगल येथे हिंदुस्थानी हवाई दलाचा अकादमीत संयुक्त स्नातक परेड (सीजीपी)चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी हिंदुस्थानी वायुसेना शाखांच्या फ्लाइट कॅडेटला प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह उपस्थित होते. यावेळी एअरफोर्सच्या जवानांनी उंच आकाशात विविध प्रात्यक्षिके सादर केली. जवानांनी आपल्या मर्यादा वाढवाव्यात, नवीन काwशल्य आणि क्षमतेचा शोध घ्यावा. राष्ट्राच्या सेवेसाठी घेतलेली शपथ संपूर्ण आयुष्यासाठी कटिबद्ध आहे, असे ते यावेळी म्हणाले.

विमान कर्मचाऱ्यांना मिळाले थकीत वेतन

एअरलाइन कंपनी स्पाइसजेटने आपल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि सर्व कर्मचाऱयांचे थकीत वेतन दिले आहे. यासाङ्गी गेल्या तीन महिन्यांत विमान कंपनीने 160.07 कोटी रुपये दिले आहेत. आम्ही जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित कर्मचाऱ्यांचे पीएफ भरले आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

हिरामंडी सर्वात जास्त गुगलवर सर्च

2025 या नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात होईल, परंतु 2024 मध्ये गुगलवर सर्वात जास्त कोणते शब्द सर्च करण्यात आले, याची यादी गुगलकडून प्रसिद्ध करण्यात आली. गुगलवर सर्वात जास्त 10 टॉप चित्रपट सर्च करण्यात आले. यात पहिल्या स्थानावर हिरामंडी, तर दुसऱया स्थानावर 12 वी फेल या चित्रपटाचे नाव आहे.

डीपफेकसाठी मेटाचे नवे टूल

एआयचा वापर करून डीपफेक व्हिडीओ कंटेटला रोखण्यासाङ्गी मेटाने एक नवीन टूल व्हिडीओ सील जारी केले आहे. या टूलद्वारे एआयने बनवलेल्या व्हिडीओला वॉटरमार्क लावण्याचे काम करेल. हे नवीन टूल कंपनीच्या सध्याच्या वॉटरमार्ंकग टूल्स, ऑडिओ सील आणि वॉटरमार्क एनीथिंगमध्ये दिसेल. हे टूल ओपन सोर्स असेल.

आधार अपडेटला पुन्हा मुदतवाढ

फ्रीमध्ये आधार अपडेट करण्यासाठी यूआडीएआयने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. 14 डिसेंबर 2024 ला ही डेडलाइन संपणार होती, परंतु आता या मोफत सुविधाअंतर्गत कार्डधारकांना 14 जून 2025 पर्यंत आधार अपडेट करता येणार आहे. या निर्णयामुळे देशातील कोट्यवधी लोकांना याचा फायदा मिळणार आहे.

श्रीलंकेचे राष्ट्रपती हिंदुस्थान दौऱ्यावर

श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके हे उद्या, 15 डिसेंबरपासून हिंदुस्थान दौऱयावर येत आहेत. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. या दौऱयात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी ही माहिती दिली.

स्वीत्झर्लंडचा हिंदुस्थानला झटका

स्वीत्झर्लंडने केंद्रातील मोदी सरकारला मोठा झटका दिला. हिंदुस्थानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड दर्जा स्वीत्झर्लंडने मागे घेतला आहे. यामुळे पुढील वर्षी जानेवारीपासून स्वीत्झर्लंडमध्ये विक्री होणाऱया हिंदुस्थानच्या उत्पादनांवरील लाभांवर 10 टक्के कर लागणार आहे. याचा हिंदुस्थानातील कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.