‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील अभिनेत्री तेजस्विनी सुनील लग्नबंधनात अडकली. तेजस्विनीने श्रीराम निजामपूरकरशी 31 डिसेंबरला पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. तिचा लग्न सोहळा पेशवाई थाटात पार पडला.
नववर्षाच्या स्वागतासाठी बिर्याणीला पसंती
नववर्षाची पार्टी साजरी करण्यासाठी देशभरातील लोकांनी ऑनलाईन ऑर्डर करणे पसंत केले. स्विगीने आवडत्या पदार्थाला मतदान देण्याचे आवाहन केल्यानंतर देशातील 58.7 टक्के लोकांनी बिर्याणीला पसंती दर्शवली. 34.6 टक्के लोकांनी पिझ्झाला तर 6.7 टक्के लोकांनी बर्गरला पसंती दिली. सर्वाधिक बुकिंग बंगळुरू, पुणे आणि जयपूरमधून झाल्याची माहिती स्विगीने दिली आहे. बंगळुरूमध्ये जास्त ऑर्डर बिर्याणीला मिळाली.
यूएईमध्ये विमान कोसळून हिंदुस्थानी डॉक्टर ठार
संयुक्त अरब अमिरातीच्या रास अल खैमाह येथील किनाऱ्याजवळ हलक्या वजनाचे विमान कोसळून झालेल्या अपघातात हिंदुस्थानी वंशाचा डॉक्टर ठार झाला. सुलेमान अल माजिद हा या विमानाचा सहवैमानिक होता. सुलेमान याने हे विमान आपल्या कुटुंबीयांसह फेरफटका मारण्यासाठी भाडय़ाने घेतले होते.
78 कोटींचे शेअर्स विकून सीईओपदाचा राजीनामा
इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेडचे सहसंस्थापक निशांत पिट्टी यांनी कंपनीच्या सीईओपदाचा राजीनामा दिला, परंतु राजीनामा देण्याआधी पिट्टी यांनी तब्बल 78 कोटी रुपयांचे शेअर्स विकले आहेत.
3 वर्षांची चेतना बोअरकेलमधून बाहेर
राजस्थानमधील कोटपुतली येथील बोअरकेलमध्ये अडकलेल्या 3 वर्षीय चेतनाला 10 दिकसांनंतर 170 फूट खोलीतून बाहेर काढण्यात यश आले. बेशुद्ध चेतनाची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मुंबई महापालिकेत 2771 होमगार्ड पदांची भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 2771 होमगार्ड पदांची भरती करण्यात येत आहे. अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली असून 10 वी पास असणाऱयांसाठी ही सुवर्णसंधी आहे. 10 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
तीन पत्ती बेटिंगमध्ये 90 लाख गमावले
ऑनलाईन सट्टेबाजी गेममध्ये एका काश्मीरी व्यक्तीने अवघ्या सहा महिन्यांत 90 लाख रुपये गमावले. हा व्यक्ती तीन पत्ती ऑनलाईन सट्टा खेळत असायचा. सट्टा खेळण्यासाठी त्याला जमीन विकावी लागली.