केरळमध्ये महिला आणि तिच्या जुळ्या मुलींची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षांनंतर दोन फरार माजी सैनिकांना पुद्दुचेरी येथून अटक करण्यात आली. 10 फेब्रुवारी 2006 रोजी केरळमधील एक महिला आणि तिच्या 17 दिवसांच्या जुळ्या मुलांची हत्या करण्यात आली होती. हत्या करणारा दिबिल कुमार बी आणि त्याचा साथीदार पी राजेश या दोन माजी सैनिकांना 2006 मध्ये लष्कराने फरार घोषित केले होते.
छत्तीसगडमध्ये 4 नक्षलवाद्यांचा खात्मा; जवान शहीद
जगदलपूर – छत्तीसगडच्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिह्यात सीमेवर अबूझमाडच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी रात्री उशिरा चकमक उडाली. या चकमकीत जीआरजी जवान सन्नू कारम शहीद झाला, तर जवानांनी एका महिला नक्षलवाद्यासह चार जणांचा खात्मा केला. शहीद जवान सन्नू कारम यांनी काही वर्षांपूर्वीच नक्षलवाद सोडून आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर ते पोलिसात भरती झाले होते.
बांगलादेशी न्यायाधीशांचा हिंदुस्थान दौरा रद्द
ढाका – बांगलादेशच्या अंतरिम सरकारने प्रशिक्षणासाठी हिंदुस्थानात येणाऱया 50 न्यायाधीशांचा दौरा रद्द केला आहे. हे सर्व न्यायमूर्ती आणि न्यायिक अधिकारी 10 फेब्रुवारीपासून प्रशिक्षणासाठी हिंदुस्थानात येणार होते. या न्यायाधीशांच्या प्रशिक्षणाबद्दल शेख हसीना पंतप्रधान असताना करार झाला होता.
इलेक्ट्रिक बाईकच्या स्पह्टात चिमुरडी ठार
रतलाम – इलेक्ट्रिक बाईक चार्ंजक करताना अचानक झालेल्या स्पह्टात 11 वर्षांची चिमुरडी ठार झाली तर आणखी दोघे गंभीररीत्या भाजले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बाईकची दोनच दिवसांपूर्वी दुरुस्ती केली होती.