
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवल्यानंतर आता राजरोसपणे महाराष्ट्राचे गुजरातीकरण सुरू आहे. मराठी संस्कृतीचा गंध असलेल्या डोंबिवलीत मराठी भाषेची अवहेलना करणारा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी आदेश धाब्यावर बसवून राजरोसपणे दुकानावर गुजराती भाषेतील फलक आणि पाट्या लावल्या जात आहेत. जाणीवपूर्वक मराठी भाषा हद्दपार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
डोंबिवली पूर्वेतील वीर सावरकर रोडवर एका दुकानाने प्रमुख नामफलक गुजराती भाषेत लावला आहे. घोघरी जैन समाजाच्या वतीने चालवले जाणारे हे दुकान त्यांच्या समाजातील लोकांना स्वस्त दरात किराणा सामान पुरवते. त्यामुळे या ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहेत. सर्व दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठीत असले पाहिजेत अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे केडीएमसीचे सक्त आदेश आहेत. परंतु या दुकानाने नियम डावलत गुजराती पाटी लावल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली