धक्कादायक! 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून खाली फेकलं, नंतर आईनेही उचललं टोकाचं पाऊल

पनवेलमधील पळस्पे परिसरात अत्यंत धक्कदायक घटना घडली आहे. येथे एका आईनेच आपल्या पोटच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून खाली फेकल्याची घटना घडली आहे. ज्यात या मुलीचा मृत्यू झाला आहे. मुलीला 29 व्या मजल्यावरून खाली फेकल्यानंतर आईनेही इमारतीवरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे.

मैथिली दुवा असे या आईचे नाव असून, मायरा दुवा असे तिच्या 8 वर्षाच्या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातील सगळ्याच नागरिकांना धक्का बसला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. आईने हे टोकाचं पाऊल का उचललं? यामागे नेमकं काय कारण होतं, याचा पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील मॅरेथॉन नॅक्सॉन इमारतीत बुधवारी सकाळी ही घटना घडली. मैथिलीचे पती आशिष दुवा यासोबत काही दिवसांपासून वाद सुरू होते, असे सांगण्यात येत आहे. यातच बुधवारी सकाळी मैथिलीने तिच्या 8 वर्षीय मुलगी मायराला आधी 29 व्या मजल्यावरून खाली ढकलून दिल. ज्यात तिचा मृत्यू झाला. नंतर स्वतः ही इमारतीवरून उडी मारून जीवन संपवलं. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.