शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची विधानसभा निवडणुकीची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत तीन उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
वर्सोव्यातून हरुन खान, घाटकोपर पश्चिममधून संजय भालेराव तर विलेपार्लेमधून संदिप नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
१६४ वर्सोवा – हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम – संजय…— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 26, 2024
90 चा फॉर्म्युला
महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष प्रत्येकी 85 ऐवजी 90 जागांवर लढणार आहेत, अशी माहिती आज काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. जागावाटपात इतर घटक पक्षांनाही मानाचे स्थान देण्यात आले असून उर्वरित 18 जागा मित्रपक्षांना सोडण्याचे निश्चित झाले आहे, असे थोरात यांनी नमूद केले.
83 उमेदवार जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आतापर्यंत 83 उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाने पहिल्या यादी. 65 उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर 15 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. आणि आज तीन उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे पक्षाने आतापर्यंत 83 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.