
जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सारा देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात आत्तापर्यंत 26 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)
दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
याचा निषेध करण्यासाठी पुण्यातील डेक्कन यथील सावरकर स्मारका जवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
हिंदू, हिंदुस्थानात खतरे मै… मोदी घुमते जहाँ मे…’, देशाच्या सुरक्षेचे तीन तेरा… मोदी साहेबांचा सतत परदेश दौरा’,
पर्यटकांवर हल्ला, दहशतवाद्यांना ठेचा’, अशा आशयाचे फलक घेऊन शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.