
विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातून महाविकास आघाडीतील शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बाजी मारली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब विजयी झाले आहेत. तर शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ज.मो. अभ्यंकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे मुंबईतील शिक्षक आणि पदवीदर मतदारसंघात शिवसेनेनेच बाजी मारली आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार श्री. ज.मो. अभ्यंकर जी ह्यांच्या दणदणीत विजयाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!@ShivSenaUBT_ #teachersconstituency #Mumbai #JMAbhyankar #ShivsenaUBT #MahavikasAghadi pic.twitter.com/J7cUCwOEkO
— Sanjay Dina Patil (@SDPatil_16) July 1, 2024
मुंबई शिक्षक मतदारसंघात पंचरंगी लढत झाली. या मतदारसंघात शिवसेनेचे अभ्यंकर, भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिंदे गटपुरस्कृत शिवाजी शेंडगे आणि अजित पवार गटाकडून शिवाजी नलावडे हे पाच उमेदवार रिंगणात होते. यात शिवसेनेच्या ज.मो. अभ्यंकर यांनी विजय मिळवला आहे. शिवसेना खासदार संजय दीना पाटील यांनी विजयाबाबत अभ्यंकर यांचे अभिनंदन केले आहे.