उद्धव ठाकरे यांनी घेतली राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राबाबत आणि राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात बुधवारी नवी दिल्लीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी आले होते.

उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यातील भेटीगाठींना महत्त्व आले असून राजकीय वर्तुळाचे आणि महाराष्ट्राचे लक्ष दिल्लीतील या घडामोडींवर आहे.