
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शेअर बाजारातील घसरणीवर भाष्य केले. मोदी नेहमी म्हणत होते की, आपली सत्ता आल्यावर शेअर बाजाराचे सर्व विक्रम मोडेल, आता तसेच झाले आहे. हीच मोदींची ताकद आहे. त्यांनी शेअर बाजाराचे विक्रम त्यांनी मोडले आहे मात्र शेअर बाजाराच्या तेजीचे विक्रम मोडले नसून त्यांनी बाजाराच्या घसरणीचे विक्रम मोडले आहेत, असा जबरदस्त टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
मोदी यांची अनेक भाषणे आपण पाहिली आहेत, तसेच त्यांच्या अनेक प्रायोजित मुलाखतीही आपण बघितल्या आहेत. ते सांगत होते फक्त माझा शपथविधी होऊ द्या, शेअर बाजार आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडेल. बाजाराने घसरणीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत. सोमवारी बाजारातील घसरणीमुळे सामान्य गुंतवणूकदारांचे 20 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. हीच मोदी यांची ताकद आहे. रुपयाचीही सर्वाधिक घसरण झाली आहे. 90 रुपये प्रतिडॉलरपर्यंत त्यांची घसरण झाली आहे.
जगभरात छोट्या-छोट्या देशांचे प्रमुखही राष्ट्रांना संबोधित करत टॅरिफ आणि आगामी आर्थिक संकटाची माहिती देत आहेत. तसेच थेट ट्रम्प यांनाही सुनावत आहेत. अशा बिकट परिस्थितीत आपले पंतप्रधान गायब आहेत, ते कोणत्या मंदिरात ध्यानधारणा करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. अशा परिस्थितीत त्यांनी देशाला संबोधन करत संकंटाची माहिती द्यायला हवी, असेही ते म्हणाले.