एसंशि गटाचे अस्तित्व नाही, भाजपचा पाठिंबा, पैशांची ताकद, ईव्हीएम घोटाळ्यामुळे त्यांचा विजय; संजय राऊत कडाडले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासादर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मिंधे यांच्या नगरविकास खात्याने केलेली सरकारची लूट कॅगच्या अहवालातून उघड केली. आता कॅगने हा भ्रष्टाचार उघड केला असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच मिंधे यांच्या एसंशि या गटाचे ज्याला ते पक्ष म्हणतात, त्याचे काहीही अस्तित्व नाही. भाजपचा पाठिंबा, पैशांची ताकद आणि ईव्हीएम घोटाळ्यामुळे विधआनसभेत ठाण्यातील त्यांना काही जागा मिळाल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.

एसंशि या मिंधे यांच्या पक्षाचे अस्तित्वच नाही. ठाण्यातील विधानसभेच्या जागा ते भाजपच्या मदतीने जिंकले आहेत. हा विजय पैशांची ताकद आणि ईव्हीएमच्या घोटाळ्यांवर मिळवला आहे. ईव्हीएमचे घोटाळे आपण म्हणत आहोत कारण दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली. याच ठिकाणी चार महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार मनोज घोरपडे हे बाळासाहेब पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा ईव्हीएमद्वारे पराभव करत 50 हजाराच्या मताधिक्याने निवडून आले. तिथे दोन दिवसांपुर्वी झालेल्या सह्याद्री साखप कारखान्याच्या निवडणुकीत पाटील यांचे पॅनल प्रंचड मताधिक्याने जिंकले. या निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या. तोच मतदार, तेच क्षेत्र, तीच माणसं फक्त त्यावेळी ईव्हीएमवर मतदान झाल्याने घोरपडे जिंकून आले आणि आता मतपत्रिकेवर मतदान झाल्याने पाटील यांच्या पॅनलच्या सर्वच्यासर्व 21 जागा जिंकून आल्या आहेत. याचाच अर्थ ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचे दिसून आले.

भाजपच्या अंधभक्तांना सर्वत्र राहू-केतू दिसतात

दीनानाथ रुग्णालयाच्या पत्रकार परिषेदेबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, देशात जिथे जिथे भाजपचे लोकं आहेत, तिथे राहू- केतू घुसले आहेत. भाजपचे लोकं अंधभक्त आहेत. जो राहू केतू विधाने करतात, ते सर्व मोदी,शहा आणि भाजपचे अंधभक्त आहेत.अंधभक्त धर्मांध असतात, त्यांना सर्वसमान्यांचा विचारच करता येत नाही. त्यांच्या डोक्याला बधीरता आलेली असते, त्यामुळे त्यांना राहू केतू दिसतात, असा हल्लाबोलही त्यांनी केली.