दाऊदचा हिरवा रंग लागलेले प्रफुल्ल पटेलांसारखे दलाल संसदेत महाराष्ट्राचे नेतृत्व करतात, हे दुर्दैव; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत वफ्फ बोर्ड, प्रफुल्ल पटेल, देवेद्र फडणवीस आणि भाजपवर हल्लाबोल केला. दाऊदशी संबंध असणारे प्रफुल्ल पटेल संसदेत महाराष्ट्राचे नेृतृत्व करत आहेत, हे दुर्दैव असल्याचेते म्हणाले. भाजपने वॉशिंग मशीनमध्ये त्यांना स्वच्छ केले आहे. मात्र, त्यांचा इतिहास काढला तर त्यांना देश सोडावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेच्या झालेल्या मृत्यूवरून भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस काय करत आहेत, असा सवालही त्यांनी केला.

देशाचा सर्वात मोठा दुश्मन पाकिस्तानात बसला आहे. त्याच्याशी प्रफुल्ल पटेल यांचे संबंध आहेत. म्हणजे ते दाऊदच्या पक्षातून भाजपत गेले आहेत. भाजपत गेले कारण त्यांना त्यांची संपत्ती वाचवायची होती.तसेच तरुंगात जाण्याची भीती असल्याने प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सर्व संबंधांसह भाजपत गेले. राष्ट्रीय सुरक्षेची भाषा करणाऱ्या अमित शहा यांनी त्यांना पक्षात धूवून घेतले. त्यांचे वॉशिंग मशीनने स्वच्छ केले. असे प्रफुल्ल पटेल संसदेत आहेत. याची लाज वाटते. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षात घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगत आहेत, असा शब्दांत त्यांनी पटेल यांना सुनावले.

अजित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना पक्षात घेऊन स्वतःचे अवमूल्यन करून घेतले आहे. प्रफुल्ल पटेलसारखे लोकं कोणाचेही नसून ते दलाल आहेत. कधी काँग्रेसची दलाली करत होते, दाऊदची दलाली करत होते. त्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेले. असे लोकं संसदेत आहे. त्यांची संसदेत बोलण्याची लायकी आहे का, आधी भाजपने स्वतःचे रंग पाहावेत. त्यांना दाऊदचा हिरवा रंग लागलेला आहे. ते वफ्फवर बोलत आहेत. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या नादाला लागू नये, असेही त्यांनी ठणकावले.

ते भाजपला चमचेगिरी करून दाखवत होते. अशी माणसे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ते आपण निष्ठेचा पुतळा असल्याचे दाखवत होते. त्यांचा सगळा इतिहास काढला तर त्यांना देश सोडावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. फडणवीस, मोदी, शहा यांच्यासमोर वाकलेले हे लोकं आहेत. त्यांना पाठीचा कणा नाही. हे महाराष्ट्राचे नेतृत्व संसदेत करत आहेत. अशा लोकांना भाजप खाद्यांवर घेऊन फिरत आहे. भाजपनेही आपली लायकी दाखवून दिली आहे. दाऊदचा आरोप पंतप्रधान मोदी यांनीच केला आहे. कुछ लोग मिर्चीका व्यवहार करते है और कुछ लोकं मिर्चीसे व्यवहार करते है., हे वक्तव्य मोदी यांचे आहे. या लोकांनी नंतर भाजपची चाटूगिरी करत आरोप धूवून काढण्याचा प्रयत्न केला.

दाऊदशी संबंध, इक्बाल मिर्चीची संबंध, बॉम्बस्फोटाच्या आरोपांशी संबंध, हेआरोप आहेत त्यांच्यावर. आता ईडीने क्लीनचीट दिली, असे ते सांगितील. मात्र, ही क्लीनचीट कशी मिळाली,हे जनतेला माहिती आहे. त्यांनी आमच्या रंगावर बोलू नये, असेही संजय राऊत म्हणाले. भ्रष्टाचाऱ्यांना पक्षात घेत भाजपने बहुमत मिळवले आहे. वफ्फच्या जमिनी बळकावण्यासाठीच हे सर्व सुरू आहे. आम्ही या भ्रष्टाचाराविरोधात आहोत. या जमिनी कोणाकडे जातात, हे जनतेला लवकरच कळेल. जे दाऊदच्या जमिनी घएऊ शकतात, ते वक्फच्या जमिनीही बळकावणार आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले. सरकारला वफ्फ बोर्डाच्या जमिनीची चिंता आहे. मात्र, चीनने अतिक्रमण केलेल्या जमिनीची चिंता नाही. कश्मीरी पंडितांच्या जमिनीची त्यांना चिंता नाही, याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पत्नीसाठी रुग्णालयात फोन केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भिसे कुटुंबावर संकट ओढवले आहे. एका मातेचा करुण अंत झाला आहे. तर देवेंद्र फडणवीस सरकारला 100 दिवस झाले म्हणून भविष्याचा वेध घेत बसले आहेत. गोरगरिबांची, सर्वसामान्यांची कामे ही फडणवीस यांची नाहीत. त्यांची लेव्हल खूप वरची आहे. शेतकरी,सर्वसामान्य तडफडून मरत आहेत आणि योजना फक्त कागदावरच आहेत. मिंधे आणि अजित पवार फक्त पोपटपंची करत फिरत आहेत. अदानी, अंबानी, टाटा, बिर्ला यांची कामे ही फडणवीस यांची आहे. फडणवीस यांची ही लेव्हल आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी हाणला. मंत्रालयात बसून दम देणे सोपे आहे. मात्र, राज्यात अराजक आणि बजबजपुरी माजली आहे, याची फडणवीस यांना जाणीवही नाही. ते मोदींचे भजन करत आहेत. योदनांची स्वप्ने दाखवत आहे.

महाराष्ट्रात सर्वसामान्य माणासाकडे 20 लाख रुपये मागितले जातात. सर्वसामान्य माणसाकडे 20 लाख रुपये कसा असतील. हा अदानी, अंबानी यांचा महाराष्ट्र नाही. हा सर्वसामान्य आणि गोरगरिबांचा महाराष्ट्र आहे. आता फडणवीस यांच्यामध्ये हिंमत असेल तर रुग्णालयावर कारवाई करावी. भिसे कुटुंब ज्या डॉक्टरचे आणि संबिधतांचे नाव घेतात. त्यांच्यावर कारवाई करून दाखवावी. फक्त विरोधी पक्षांच्या नेत्यांवर कारवाई करण्यातच त्यांचे काम चालते. त्यांची लेव्हलच वेगळी असल्याने त्यांना राज्यात काय सुरू आहे, ते माहिती नाही. नागपूरात गोळीबार झाला, हे देखील त्यांना माहिती नाही, असेही ते म्हणाले.