एसटीच्या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. एसटीच्या भाडेवाढीविरोधात मंगळवारी (दि.28 जानेवारी रोजी) सकाळी 11 वाजता शिवसेनेकडून (उध्दव बाळासाहेब ठाकरे) राजापूर एसटी डेपोसमोर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख कमलाकर कदम यांनी दिली.
सगळीकडेच महागाई वाढलेली असताना एसटीच्या तिकीटदरात 15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एसटीच्या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. निवडणूकीनंतर महायुती सरकारने केलेल्या या भाडेवाढीमुळे जनतेमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शिवसेनेकडून (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.