
शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने मराठी भाषा दिनानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळ्यात माय मराठीचा आवाज घुमला. परेश दाभोळकर प्रस्तुत स्वर मैफिल निर्मित ‘बोल मराठी, ताल मराठी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मायमराठीचा जागर करण्यात आला. सुरुवातीला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा माहितीपट दाखवण्यात आला. यानंतर मायमराठीची संपन्नता दाखवणारी विविध गीते सादर झाली.
‘सूर निरागस हो’, ‘अरे खोप्यामधी खोपा’, ‘माझी मैना गावाकडे राहिली’, ‘खेळ मांडला’, ‘लाभले आम्हास भाग्य’ अशी सुमधुर गीते सादर झाली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीते सादर झाली. ‘हे हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा’, ‘जय जय शिवराय’, ‘ने मजसी ने…’ आदी गीते प्रमोद तळवडेकर, अभिषेक मारोटकर, सपना हेमण, पल्लवी केळकर यांनी गायली. त्याला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि ‘मी मराठी’चा जयघोष केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वेशभूषेत कलावंत रंगमंचावर आले. उपस्थितांनी टाळय़ांच्या गजरात त्यांना अभिवादन केले आणि त्यांची प्रतिमा मोबाईलमध्ये टिपली. अवघे वातावरण मराठीमय झाले. कार्यक्रमाचे निवेदन परेश दाभोळकर आणि हेमंत बर्वे यांनी केले.
यावेळी शिवसेना नेते, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष-खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते विनायक राऊत, खासदार संजय दीना पाटील, आमदार अजय चौधरी, हारून खान, मनोज जामसुतकर, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्याध्यक्ष आमदार सुनील शिंदे, आमदार महेश सावंत, बाळा नर, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार विलास पोतनीस, चंदूमामा वैद्य आदी उपस्थित होते. तसेच स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे सरचिटणीस प्रदीप मयेकर तसेच पदाधिकारी वामन भोसले, प्रदीप बोरकर, अनिल चव्हाण, उल्हास बिले, दिनेश बोभाटे, उमेश नाईक, शरद जाधव, सुधाकर नर, शरद एक्के, विजय अडसुळे, बाळासाहेब कांबळे, विलास जाधव, अजय गोयजी, श्रीराम विश्वासराव, सुरेश नार्वेकर, ललित साने, संदीप गावडे, अरुण दुबे, प्रवीण हाटे, तुकाराम गवळी, प्रवीण हाटे, नितीन रेगे, किरण फडणीस, प्रदीप पाटील, मयुरेश सावंत, दशरथ गांधी, श्याम परब, राजन तांडेल, गोरखनाथ पवार, किरण पिंपुटकर, राजेंद्र राऊत, सलील कोटकर, कृष्णा घाटकर, संतोष राणे, किरण शिंदे, स्मिता तेंडुलकर, नूतन समेळ, धनलक्ष्मी पेंकरे, कल्याणी सावंत, विभागप्रमुख संतोष शिंदे उपस्थित होते.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शीव-कोळीवाडा विधानसभा निरीक्षक शिवाजी गावडे यांनी प्रयागराज येथील महाकुंभमेळय़ातून आणलेला गंगाकलश उद्धव ठाकरे यांना भेट दिला.
मराठीला अभिजात दर्जा शिवसेनेमुळे – अरविंद सावंत
शिवसेनेने ‘अभिजात’ मराठीचा विषय सातत्याने लोकसभेत मांडला. मराठीला अभिजात दर्जा मिळालाय तो उद्धव ठाकरे आणि शिवसेनेमुळे, असे प्रतिपादन शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी केले. मराठीचा जयघोष हा आजच्या एका दिवसापुरता मर्यादित नाही. मुंबई महापालिकेवर मराठीचा जागर दिसला पाहिजे. ‘मी मराठी… मी शिवसैनिक… मी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक… आता मराठीची मशाल, करा विशाल,’ असे आवाहन अरविंद सावंत यांनी केले.