बोलका पोपट… बोलकी मैना, रामदास कदम, नीलम गोऱ्हे विरोधात आंदोलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बेताल आणि तथ्यहीन वक्तव्ये करणारे गद्दार सेनेचे तथाकथित नेते, बोबडा पोपट रामदास कदम आणि खोटी मर्सिडीज देऊन खरी पाकिटे मिळवणाऱ्या नीलम गोऱ्हे यांच्याविरुद्ध ‘फटके द्या’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात म्हैस आणण्यात आली होती. या म्हशीवर ‘वायफट बडबड करणाऱ्या नीलु रेगोचा जाहिर निषेध’ अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे रास्ता पेठ येथील पॉवर हाऊस चौक येथे हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, उत्तम भुजबळ, दत्ता जाधव, डॉ. अमोल देवळेकर, रामभाऊ पारिख, रोहिणी कोल्हाळ, पद्मा सोरटे, मोहन दुधाणे, विजय नायर, रमेश परदेशी, अनिल दामजी, दिलीप पोमण, राजेंद्र शहा, नंदू लोखंडे, मोहन यादव, योगेश खरात, नितीन निगडे, भगवान वायाळ, अरुण कदम, राजेंद्र जाधव, राजमहंमद शेख, अनावर सय्यद, विद्या होळे, अजय परदेशी, बकूळ धाकवे, सचिन चिंचवडे, मिलिंद पत्की, विजय पालवे, सुरज पहिलवान, राजू थोरात, राजेंद्र मुपिड, गोरे आदी उपस्थित होते.

बोबडा पोपट रामदास कदम आणि संधीसाधू नेत्या निलम गो-हे यांच्या विरोधात सामान्य नागरिकांनीही तीव्र विरोध दर्शवला. बेजबाबदार, स्वार्थी नेत्यापेक्षा ‘म्हैस’ बरी असेही मत महिलांनी नोंदवले. यावेळी आंदोलनादरम्यान आणण्यात आलेल्या म्हशीला निलम नाव दिल्याने रोहिणी कोल्हाळ यांनी म्हशीची जाहिर माफी मागितली. महिला सशक्तीकरणाच्या आंदोलनास स्वतःच्या राजकिय स्वार्थासाठी वावरण्याचे पातक निलम गोन्हे वारंवार करतात. स्त्री आधार केंद्राने खरोखर मदत केलेली एक तरी महिला दाखवा आणि एक लाख मिळवा, असे आव्हान पद्मा सोरटे यांनी केले. बेताल आणि तथ्यहीन वक्तव्य करणाऱ्या य नेत्यांना तत्काळ संवैधानिक पदांवरून हटवावे, त्यांच्या मर्सिडिज घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी उत्तम भुजबळ यांनी केली