
राज्याच्या विविध भागांमध्ये शिवसेनेचे निर्धार मेळावे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करत आहेत. पश्चिम विदर्भातील शिवसैनिकांचा निर्धार मेळावा येत्या 15 एप्रिल रोजी अमरावतीमध्ये होत आहे. शिवसेना नेते-खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक आहेत.
अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता हा मेळावा होणार आहे. शिवसेना उपनेते-आमदार नितीन देशमुख, यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख, दर्यापूरचे आमदार गजानन लवटे, बुलढाणा मेहकरचे आमदार सिध्दार्थ खरात आणि वणीचे आमदार संजय देरकर हे या मेळाव्यात प्रमुख वत्ते असणार आहेत.
पश्चिम विदर्भातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख पराग गुडधे, मनोज कडू, नरेंद्र पडोळे यांनी केले आहे.