आर उत्तर महानगरपालिका कार्यालयावर शिवसेनेचा हंडा मोर्चा; मुंबईत पाण्याचा तुटवडा, अशुद्ध पाणी

मुंबईकरांना भेडसावणारा पाण्याचा तुटवडा,  अशुद्ध पाणी तसेच मुंबईकरांना लागू होणारा प्रस्तावित कचरा कर, रस्त्यांची अर्धवट कामे, नालेसफाईतील दिरंगाई, ठिकठिकाणी दिसणारे कचऱ्याचे ढीग या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी शिवसेनेच्या वतीने बोरिवलीतील आर मध्य महानगरपालिका कार्यालयावर बुधवारी हंडा मोर्चा काढण्यात आला.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना विभाग क्रमांक 1 च्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाचे आयोजन विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि विभाग संघटक शुभदा शिंदे यांनी केले होते. यावेळी माजी नगरसेवक संजीव बावडेकर, योगेश भोईर, चेतन कदम, सिमंतिनी नारकर, विधानसभा प्रमुख संजय भोसले, अशोक म्हामुणकर, शरयू भोसले, उपविभागप्रमुख पांडुरंग देसाई, मनोहर खानविलकर, उत्तम बारबोले उपविभाग संघटक अश्विनी सावंत, वंदना खाडे, सोनाली विचारे, सुविधा गवस यांच्यासह शिवसैनिक तसेच नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.