Pahalgam Terror Attack – दिलीप देसले यांच्या कुटुंबीयांची किशोरी पेडणेकर यांनी सांत्वनपर भेट घेतली

कश्मीरमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेले पनवेलमधील खांदा कॉलनी येथील दिलीप देसले यांच्या कुटुंबीयांची गुरुवारी शिवसेना उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख रेवती सपकाळ, सुजाता कदम, शहर संघटक अर्चना कुळकर्णी, ज्योती मोहिते, संगीता राऊत, मालती पिंगळा, शहरप्रमुख यतीन देशमुख, सूर्यकांत म्हसकर, प्रवीण जाधव, अवचित राऊत, पराग मोहिते, सनी टेमघरे आदी उपस्थित होते.