
राहुरी येथे सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. या घटनेचा निषेध करून यामध्ये दोषी असलेल्या आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी, अशी मागणी श्रीरामपूर शहर व तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
या संदर्भातील निवेदन श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना देण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख लखन भगत, राधाकिसन बोरकर, शहरप्रमुख संजय छल्लारे उपस्थित होते.
यावेळी शहरप्रमुख संजय छल्लारे म्हणाले, राहुरी येथे घडलेली घटना निंदनीय असून, आम्ही त्याचा निषेध करीत आहोत. या घटनेचा सखोल तपास करून यामध्ये दोषी असलेल्या आरोपींना अटक करावी. राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरून अवमान करण्याचा काही महाभाग प्रयत्न करीत आहेत. राहुरी येथील महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही घटना सामाजिकदृष्ट्या सर्वांसाठी अत्यंत घातक आहे. राज्य शासनाने अशा घटना पुन्हा घडू नयेत, याकरिता कडक पावले उचलावीत. या संदर्भात अनेकांनी श्रीरामपूर बंद करावे, अशी मागणी केली होती. परंतु श्रीरामपूर शहरातील छोटे, मोठे व्यापारी यांचे नाहक नुकसान होऊ नये, याकरिता बंद ऐवजी या घटनेच्या संदर्भातील निवेदन देत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका युवा अधिकारी सुरेश थोरे, सिद्धांत छल्लारे, भगवान उपाध्ये, तेजस बोरावके, संजय साळवे, सुरेश कांगुणे, किशोर ढोकचौळे, संजय परदेशी, सुनील थोरात, रोहित नाईक, उत्तमराव कल्याणकर, शरद गवारे, विशाल पापडीवाल, संजय लाड, नीलेश महाले, विशाल दुपाटी, प्रमोद गायकवाड, दत्ता करडे, बापू बुधेकर, अकिल पठाण, प्रमोद टाकसाळ, प्रकाश परदेशी, शंभू छल्लारे, सोनू त्रिभुवन, किशोर फुनगे, प्रदीप मोहिते, गणेश भगत, सोनू कोळसे, हबीब शेख, लक्ष्मण बर्डे, विशाल रहिले, गोपाल अहिरराव, गोपाल राजगुरू, नामदेव हळनोर, सोपान बोराडे, सदा मामा कराड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.