सुधाकर सुर्वे यांची गुरुवारी शोकसभा

निष्ठावंत शिवसैनिक, माजी विभागप्रमुख सुधाकर सुर्वे यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. सुधाकर सुर्वे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार 18 जुलै रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत हर्ष बॅक्वेट हॉल, चारकोप येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सुधाकर सुर्वे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.