सत्ता आणि पैशांच्या जोरावर कोणी कितीही वलग्ना केल्या तरी पनवेलमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवू, असा एकमुखी निर्धार आज शिवसैनिकांनी केला. पनवेल, खारघरवासीयांना आता बदल हवाय. त्यामुळे पुढील आमदार शिवसेनेचाच होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा निवडणूक मुख्य समन्वयक विजय कदम, जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभेतील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार लीना गरड यांच्या प्रचारार्थ बैठक झाली झाली. ही बैठक शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे पार पडली.
या बैठकीस निरीक्षक अनिल चव्हाण, संदीप भालेकर, उमेदवार लीना गरड, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, उपजिल्हा संघटक प्रशांत अनगुडे, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, दीपक घरत, शशिकांत डोंगरे, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर बडे, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, सर्व शहरप्रमुख, शहर संघटक, सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक रेवती सकपाळ, महानगर संघटक सुजाता कदम, तालुका संघटक अनिता डांगरकर, अवचित राऊत, पराग मोहिते, नितीन पाटील, केवळ माळी, मनोज कुंभारकर उपस्थित होते.