वरळीत शिवजयंतीचा उद्या भव्य सोहळा, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा क्र. 196 च्यावतीने 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रेमनगर, वरळी नाका येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठापना, शिवपूजा, दीपपूजन, शिवचरित्रकार ह.भ.प. जय महाराज बोर्गे यांचे व्याख्यान, पुणेरी ढोल-ताशा पथक, ज्येष्ठ शिवसैनिकांचा आणि आरोग्य सेविकांचा सत्कार, लेझर लाईट शो अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक – उपशाखाप्रमुख दशरथ बोर्डवेकर यांनी दिली.