
अखंड हिंदुस्थानचे दैवत, महाराष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्यक्तिमत्त्काच्या विविध पैलूंपैकी हिंदुस्थानी नौदलाचे जनक अशीही महाराजांची ओळख आहे.महाराजांच्या अतुलनीय आरमाराची यशोगाथा म्हणजेच ‘दर्यापती शिवराय’ हे प्रदर्शन आहे. छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिक्हलमध्ये 9 ते 12 जानेकारीला दादरमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे. केध फाऊंडेशन, शिवसेना सचिक साईनाथ दुर्गे यांनी याचे आयोजन केले आहे. फेस्टिक्हलचे हे चौथे वर्ष आहे.शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिक्हलमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रातील गडकिल्ले, शस्त्रास्त्र, शिल्पकला, खाद्य संस्कृती आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन मुंबईकरांना घडत आले आहे. या विविधतेबरोबरच याकेळी ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शनात शिवकालीन लढाऊ जहाजांच्या प्रतिकृती, सागरी किल्ल्यांचे अप्रतिम छायाचित्रे, इंग्रजांना शह देणाऱ्या मराठ्य़ांच्या खांदेरी युद्धाची प्रतिकृती, मराठय़ांची आरमारी शस्त्रs आणि बरेच काही या प्रदर्शनात पाहता येणार आहे. दादर पश्चिमेतील स्वातंत्र्यवीर साकरकर मार्गाजवळील वनिता समाज हॉलमध्ये हे प्रदर्शन भरणार असून सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले आहे. या प्रदर्शनासाठी श्री शिवराज्याभिषेक दीपोत्सव सेका समिती, दुर्गराज रायगड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.