
शिवसेना पक्षाच्या नाशिक जिल्हा निर्धार शिबिराचा प्रारंभ शिवशाहिरीने झाला. शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांची शायरी कडाडली. परंपरेप्रमाणे गोंधळ घालून शाहीर डोंगरे यांनी पोवाड्याला सुरुवात केली. शिवपूर्वीच्या स्थितीचा आढावा घेऊन त्यांनी शिवकाल वर्णन केला.
शाहीरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सादर केली. शाहीर अमर शेख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वात सुंदर पोवाडे रचले. त्यामागे समतेची भावना होती. जातीय तेढ कमी करण्याचा उद्देश होता असा दाखला दिला. महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले या महापुरुषांनी केलेल्या कर्तृत्वाचे वर्णन पोवाडय़ामधून केले. दुपारच्या सत्रातही शाहिरी डफ खणाणला. शाहीरीने निर्धार शिबिरामध्ये चैतन्य निर्माण केले.