
शिवसेना पक्षाने मुलुंडमध्ये आयोजित केलेल्या आरोग्य यज्ञाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेनेने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर आणि आरोग्य शिबिरात मुलुंडमधील रहिवासी, रायगडकर शिवसैनिक आणि वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या शिबिरास शिवसेना नेते सुभाष देसाई, आमदार सुनील राऊत आणि उपनेते भाऊ कोरगावकर यांनी उपस्थित राहत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण रायगड विभाग, शिव वाहतूक सेना आणि शाखा क्रमांक 103 च्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आणि रक्तदान शिबिराचे आयोजन मुलुंडमधील गुरुनानक सचखंड दरबार कम्युनिटी हॉल येथे करण्यात आले होते. शाखाप्रमुख आनंद पवार यांच्यासह पहर्टिस हॉस्पिटल मुलुंड आणि मीनाताई ठाकरे रक्तकेंद्र या संस्थांचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले. मुलुंडमधील शिवसैनिक, नागरिक, आणि वाहतूकदारांनी या मोफत वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला व उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड यांनी यावेळी या उपक्रमाचे महत्त्व उपस्थितांना विशद केले. तर सुभाष देसाई, सुनील राऊत, भाऊ कोरगावकर यांनी अशाच उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेना घराघरात पोहोचल्याचे सांगितले.
यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे अध्यक्ष कृष्णा कदम, संपर्कप्रमुख सुजित तांदळेकर, अमित मोरे, उद्धव कुमठेकर, चंद्रकांत धोंडगे, साधना वरस्कर, सहसंपर्कप्रमुख ज्ञानोबा बांदल, सचिन जगताप, लक्ष्मण सकपाळ, सुदाम वाडकर, समन्वयक ज्ञानेश्वर मोरे, गोविंद पवार, अश्विन धनावडे, हरिश्चंद्र महातले, शाखाप्रमुख चंद्रकांत शेलार, सुजाता इंगवले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.