नीलम गो-हेंना ‘जोडे मारो’; बेताल वक्तव्य करणाऱ्या टायरवाल्या काकूंविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक

शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर बिनबुडाचे तथ्यहिन आरोप करणाऱ्या नीलम गो-हे यांच्याविरोधात सर्वत्र संताप आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या या ‘टायरवाल्या’ काकूंविरोधात ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक, युवासैनिक यांच्यासह महिला आघाडी आक्रमक आहे. आज दुसऱ्या दिवशीही रणरागिणींनी संतप्त निदर्शने केली. नीलम गोऱ्ह यांच्या प्रतिमेला जोडे मारून ठिकठिकाणी आंदोलन केले.

कळवा नाका येथे नीलम गोल्हे यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. नीलम गो-हे हाय हाय.. अशा घोषणांनी रणरागिणींनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शहर संघटक कल्पना कवळे, उपशहर संघटक भारती शिवणेकर, विभाग संघटक अनिता गवते, अमिता चव्हाण, रुक्साना सावंत, छाया आरमृगम, उमा नलावडे, विमल ठाकूर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

भिवंडी : रांजनोली नाका येथे शिवसैनिकांनी नीलम गो-हे यांच्या फोटोला जोडे मारत संताप व्यक्त केला. आंदोलनात उपनेते विश्वास थळे, लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे, जिल्हाप्रमुख कुंदन पाटील, तालुकाप्रमुख करसन ठाकरे, शहर जिल्हाप्रमुख मनोज गगे, शहरप्रमुख प्रसाद पाटील, महादेव घाटाळ, जिल्हा उपसंघटक कविता भगत, शहर संघटक वैशाली मेस्त्री, तालुका संघटक फशी पाटील, सोन्या पाटील, कृष्णा वाकडे, इरफान भुरे, जय भगत, दीपक पाटील, अरुण पाटील यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी मध्यवर्ती शाखेसमोर शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. नीलम गो-हे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, शहरप्रमुख शरद पाटील, शहर संघटक मीना माळवे, युवती जिल्हा संघटक तेजस्वी पाटील, उपशहर संगिता गांधी, कल्पना अचन, सविता बळे, स्वाती चव्हाण, संगिता ताजणे, चंदू प्रसाद, हेमंत चौधरी, नितीन मोकल, प्रकाश जाधव, रवींद्र उतार, शांताराम डिगे, जगदीश तरे, रवींद्र उतेकर यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसैनिकांनी नीलम गो-हे यांच्याविरोधात आंदोलन केले. यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, जिल्हा संघटक अंजली राऊत, शहर संघटक सोनाली जावळे, सोनिया फरकाडे, रेश्मा काळे, वंदना पवार, सुनीता ढगे, मेघा मोरे, मनीषा भुते, सुज्ञान मेहबुबानी, उपशहरप्रमुख मधुकर महाजन, गणेश घोणे, अमर परदेशी, अंकित पवार, किशोर शिलकर यांच्यासह महिला आघाडी व शिवसैनिक उपस्थित होते.