नालेसफाई नीट न करणाऱया कंत्राटदारांवर कारवाई करू! शिवसेना शिष्टमंडळाला वॉर्ड अधिकाऱयांचे आश्वासन

पावसाळापूर्व नालेसफाई आणि विभागात सुरू असलेली रस्त्यांची कामे नीट न करणाऱया कंत्राटदारांवर कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने एफ उत्तरचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केली. या बैठकीत प्रभाग 172 ते 181 पर्यंत असलेले प्रमुख मोठे नाले, गांधी मार्पेट येथील साचणाऱया पाण्याचा निचरा करण्यासाठीची यंत्रणा चोख ठेवण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, मोठे नाले आणि बॉक्स नाले याबाबत नीट काम न केलेल्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई किंवा काळय़ा यादीत टाकण्याची शिफारस करू, असे आश्वासन अल्ले यांनी शिष्टमंडळाला दिले.

विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शीव-कोळीवाडा विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पावसाळापूर्व नालेसफाईचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी बैठकीला विधानसभा निरीक्षक शिवाजी गावडे, विधानसभा संघटक गजानन पाटील, आनंद जाधव, विनायक तांडेल, शीवचे उपविभागप्रमुख दत्ता भोसले, प्रभाकर भोगले, एकनाथ पवार, राजेश कुचिक, समन्वयक रणजित चोगले, शाखाप्रमुख संजय म्हात्रे, संजय भाबल, संजय कदम, सचिन खेडेकर, महापालिकेच्या वतीने पर्जन्यजल आणि मलःनिस्सारण निचरा विभागाचे अधिकारी पैलास वाटेकर उपस्थित होते.

मॅनहोल्स, छोटय़ा नाल्यांवर संरक्षक जाळी बसवा!

शीव-कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील नाल्यांमध्ये साचलेला कचरा आणि गाळ काढण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, रस्ते खोदून अर्धवट ठेवलेली कामे पावसाळय़ाआधी पूर्ण करा, पावसाळय़ापूर्व सर्व मॅनहोल्सवर आणि छोटय़ा नाल्यांवर लोखंडी संरक्षक जाळी बसवून ती बंदिस्त करावीत. यात दिरंगाई करणाऱया पंत्राटदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन गोपाळ शेलार यांनी चक्रपाणी अल्ले यांना दिले.