मुंबईमध्ये महाविकास आघाडीत शिवसेनाच मोठा भाऊ ठरला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष मुंबईत सर्वाधिक 22 जागा लढवत आहे. काँग्रेसने 10 तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने 3 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीला शिवाजीनगर-मानखुर्दची जागा देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीचा मुंबईतील 36 जागांचा फॉर्म्युला 22-10-3-1 असा आहे. 22 जागांवर शिवसेनेने आपले शिलेदार उतरवले आहेत. काँग्रेसने 18 जागांचा प्रस्ताव दिला होता, पण मुंबईत शिवसेनेची ताकद अधिक असल्याने काँग्रेसने फक्त 10 जागांवरच उमेदवार उतरवले आहेत. राष्ट्रवादीने घाटकोपर पूर्व, मुलुंड आणि अणुशक्तीनगर या तीन जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत.
शिवसेना
वरळी – आदित्य ठाकरे, विक्रोळी – सुनील राऊत, वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई, माहीम – महेश सावंत, मागाठाणे – उदेश पाटेकर, भांडुप पश्चिम – रमेश कोरगावकर, जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर, दिंडोशी – सुनील प्रभू, गोरेगाव – समीर देसाई, अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके, चेंबूर – प्रकाश फातर्पेकर, कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर, कलिना – संजय पोतनीस, वडाळा – श्रद्धा जाधव, शिवडी – अजय चौधरी, भायखळा – मनोज जामसुतकर, वर्सोवा – हरुन खान, घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव, विलेपार्ले – संदीप नाईक, दहिसर – विनोद घोसाळकर, मलबार हिल – भैरूलाल चौधरी जैन, बोरिवली – संजय भोसले.
काँग्रेस
कुलाबा – हिरा देवसी, अंधेरी पश्चिम -अशोक जाधव, शीव-कोळीवाडा -गणेश यादव, चारकोप -यशवंत सिंग, कांदिवली पूर्व -कालू बढेलिया, मुंबादेवी – अमीन पटेल, धारावी – ज्योती गायकवाड, चांदिवली -नसीम खान, मालाड पश्चिम – अस्लम शेख, वांद्रे पश्चिम – असिफ झकारीया.
राष्ट्रवादी
घाटकोपर पूर्व – राखी जाधव, अणुशक्ती नगर – फहाद अहमद, मुलुंड – संगीता वाझे.
स.पा.
शिवाजीनगर मानखुर्द – अबू आझमी.