आजपासून कुमार गटाच्या 24 संघांमध्ये संघर्ष

कबड्डीप्रेमी शाखाप्रमुख संजय भगत यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कुमार गटाच्या 24 संघांचा संघर्ष गुरुवार 17 एप्रिलपासून रंगणार आहे. वरळी गावच्या श्री साई आणि प्रभादेवीच्या गणेशकृपा मित्र मंडळाच्या लढतीने स्पर्धेचा उद्घाटनीय सामना खेळविला जाणार आहे.

शिवसेना शाखा क्र 193 पुरस्कृत असलेली आणि पाच दिवस रंगणारी ही स्पर्धा मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतशेठ नागवेकर क्रीडानगरी, सत्यवाडी , हातिस्कर मार्ग, जुनी प्रभादेवी येथे खेळविली जाणार आहे.24 संघांमधील ही स्पर्धा बाद फेरीमध्ये खेळविली जाईल. या स्पर्धेत प्रभादेवी-वरळीतील ओम ज्ञानदीप, यंग प्रभादेवी, संस्कृती प्रतिष्ठान, गणेश कृपा, सिद्धीप्रभा, वारस लेन, गोल्फादेवी असे तगडे संघ खेळणार आहेत. तसेच वरळी, वरळी गाव, लोअर परळ, दादर, लालबाग विभागातीलही नावाजलेले कुमार संघ या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष आणि शाखाप्रमुख संजय भगत यांनी दिली.