भैयाजी जोशी यांच्याविरोधात आंदोलन

मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी आले पाहिजे असे नाही, अशी दर्पोक्ती करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांचा निषेध करण्यासाठी शिवसेनेतर्फे मुंबईसह राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात आले. भैयाजी जोशी यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

विभाग क्रमांक 2 च्या वतीने विभागप्रमुख अजित भंडारी व विभाग संघटक मनाली चौकीदार यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर भैयाजी जोशी यांचा जाहीर निषेध करण्यात आला. विधानसभाप्रमुख संतोष राणे, अशोक पटेल, विधानसभा संघटक गणेश गुरव, विकास दसपुते, राजू सकपाळ, राजन निकम, विधानसभाप्रमुख गीता भंडारी, सुषमा कदम, शुभांगी शिंदे, माजी नगरसेविका संगीता सुतार, उपविभागप्रमुख दीपक मोरे, अंकित सुतार, प्रशांत कोकणे, प्रदीप ठाकूर, वैभव मालणकर यावेळी उपस्थित होते.

शिवसेना विभाग क्र. 10 चे विभागप्रमुख, आमदार महेश सावंत व विभाग संघटक श्रद्धा जाधव यांच्या नेतृत्वाखाली प्रबोधनकार ठाकरे चौक ते शिवसेना भवनपर्यंत निषेध रॅली काढून मराठीद्वेष्टय़ा भैयाजी जोशी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. विभागातील शिवसैनिक, युवासैनिक यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.