
हिंदूद्वेषी औरंगजेबाचे उघडपणे गुणगान गाणारे सपाचे आमदार अबू आझमी यांच्या संतापजनक वक्तव्याचा शिवसेना शाखा क्र. 142, 144 तसेच शीव-कोळीवाडा विधानसभेच्या वतीने कडाडुन निषेध करण्यात आला.
विभागप्रमुख प्रमोद शिंदे आणि विभाग संघटक पद्मावती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शाखा क्र. 142 च्या वतीने उपविभागप्रमुख रोहिदास ढेरंगे, अमित शिंदे, संदीप भोईर, विधानसभा निरीक्षक किसन जाधव, विधानसभा समन्वयक तानाजी गुरव, शीव- कोळीवाडय़ाचे विधानसभाप्रमुख गोपाळ शेलार, विधानसभा संघटक आनंद जाधव, सुहासिनी ठाकूर, निरीक्षक शिवाजी गावडे, विनायक तांडेल, उपविभागप्रमुख प्रभाकर भोगले, राजेश कुचिक, माजी नगरसेवक रामदास कांबळे, उपविभाग समन्वयक संजय भाबल, समन्वयक उपकार खोत आदी उपस्थित होते.