
बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेविरोधात मंगळवारी बदलापूरकरांनी तब्बल आठ तास रेल रोको आंदोलन केलं. पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलनकर्त्यांना रेल्वे ट्रॅकवरून हटवले. यावेळी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर आंदोलकांनी दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी 32 आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. या आंदोलकांना बुधवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले.
मिंधे-भाजप सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
मुला-बाळांच्या न्याय हक्कासाठी, संरक्षणासाठी पुढे आलेल्या जनतेला गुन्हेगार ठरवतंय. pic.twitter.com/qmqIjjHu3F— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) August 21, 2024
पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मिंधे भाजप सरकारला फटकारले आहे. ”मुला-बाळांच्या न्याय हक्कासाठी, संरक्षणासाठी पुढे आलेल्या जनतेला गुन्हेगार ठरवतंय. मिंधे-भाजप सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
नेमके काय घडले ?
बदलापूरमध्ये आदर्श विद्यालय ही भाजप आणि रा.स्व. संघप्रणीत शाळा आहे.
या शाळेत शिशु वर्गात शिकणाऱ्या साडेतीन आणि चार वर्षांच्या दोन चिमुकल्या मुली स्वच्छतागृहात जात असताना शाळेतील अक्षय शिंदे या नराधम सफाई कर्मचाऱ्याने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 12 ते 13 ऑगस्ट रोजी घडली.
पोटात दुखत असल्याची तक्रार करत मुलींनी घडलेला घृणास्पद प्रकार घरच्यांना सांगितला. पालकांनी शाळेत धाव घेतली, परंतु शाळा व्यवस्थापनाने त्यांना दाद दिली नाही आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.
पालकांनी बदलापूर पोलीस ठाणे गाठले, मात्र तेथेही पोलिसांनी त्यांना राजकीय दबावाखाली अनेक तास ताटकळत ठेवले. तुम्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करून आणा त्यानंतरच गुन्हा दाखल करू, अशी उर्मट उत्तरे पोलिसांनी पालकांना दिली.
पालकांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षाच्या शहर संघटक दक्षता तांबे यांच्याकडे मदत मागितली. तांबे यांनी तत्काळ बालहक्क संरक्षण कक्षाला फोन लावून घडलेली घटना कळवली.
बालहक्क संरक्षण कक्षाच्या अधीक्षकांनी पोलीस आणि रुग्णालयाला याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची सूचना केली. त्यानंतर चिमुकलींची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
पालकांसह त्या चिमुकलींची अकरा तास झालेल्या फरफटीनंतर अखेर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अक्षय शिंदे या सफाई कर्मचाऱ्याविरोधात 16 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे या स्वतः महिला असूनही त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.