
लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर शिवसेना आता विधानसभेसाठी सज्ज झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 3 ऑगस्ट रोजी पुणे येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा होत आहे. (सर्व फोटो – चंद्रकांत पालकर, पुणे)
पुण्यात होणाऱ्या मेळाव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. चला जिंकूया… असा निर्धार या मेळाव्यात केला जाणार असून या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे शुक्रवारी पुण्यात दाखल झाले.
पक्षप्रमुख पुण्यात येत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला असून संपूर्ण वातावरण भगवामय झाले आहे.
शुक्रवारी सकाळी उद्धव ठाकरे पुण्याकडे रवाना झाले. यावेळी मुंबई-पुणे महामार्गावर शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले.
आकाशात ढगांची गर्दी झालेली असताना आणि पावसाचे थेंब कोसळत असतानाही शिवसैनिकांचा उत्साह तसूभरही कमी झाली नव्हता. हातात भगवे झेंडे घेऊन आणि ‘आवाज कुणाचा… शिवसेनेचा’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या जात होत्या.
उद्धव ठाकरे यांचा ताफा जवळ येताच फुलांची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. ‘उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है…’, ‘शिवसेना झिंदाबाद…’ आवाज कुणाचा, शिवसेनेचा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
View this post on Instagram
उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या शुभेच्छा आणि हार, पुष्पगुच्छ यांचा स्वीकार केला. त्यानंतर ते पुण्याकडे रवाना झाले.