भाजप हिंदुत्ववादी, देशप्रेमी आहे हेच फेक नरेटीव्ह; निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरेंचे जबरदस्त फटकारे

भाजप हिंदुत्ववादी, देशप्रेमी आहे हेच फेक नरेटीव्ह, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात आयोजित शिवसेनेच्या निर्धार शिबिरात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही टीका केली आहे. हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंडचा सामना दुबईत खेळला जात आहे. याचबद्दल बोलत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली आहे. ते म्हणाले आहेत की, आपल्याला स्कोअरची चिंता नाही, आपल्याला विरोधकांची दांडी उडवायची आहे. ही मतच टीव्हीवर पाहायला काही हरकत नाही आणि दुबईत जायला सुद्धा हरकत नाही. याच्या आधीची हिंदुस्थान- पाकिस्तान मॅच दुबईतच झाली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “ती मॅच पाहण्यासाठी तथाकथित बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानणारी कार्टी गेली होती. निर्लज्जपणे त्यांनी इंस्टाग्रामवर फोटोही टाकले आहेत. अनुराग ठाकूर हे पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसले आहेत. यानंतर घराणेशाही अजिबात नसणारे, पण अगदी डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावसकर, विराट कोहली यांना शिकवणारे सन्माननीय जय शहा हे सुद्धा मॅच बघायला गेले होते. हेच जर जय शहा यांच्या जागी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे असते तर, याची नरकात गेलेल्या सगळ्या पित्रांनी थयथयाट घातला असता. फेक नरेटिव्ह जो विषय आहे, तो हाच आहे. नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच कोणाला कळत नाहीय. भाजप हिंदुत्ववादी आहे, हेच फेक नरेटिव्ह आहे.”

सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या की, जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशासोबत सरळ वागत नाही, तोपर्यंत हिंदुस्थानात पाकिस्तान बरोबर कोणतेही कोणतीही, मग ते खेळाचे असले तरी ठेवणार नाही. हिंदुत्ववादी म्हंटल्यानंतर ज्या बांगलादेशमध्ये हिंदूंचा छळ होतोय, आता तिथल्या बातम्याही येणं बंद झालंय. त्या बांगलादेशसोबत किर्केटट्ची मॅच खेळायची, पाकिस्तानसोबत क्रिकेटची मॅच खेळायची आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.