Pahalgam Terror Attack : या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी अपेक्षा, केवळ निषेध नको – आदित्य ठाकरे

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समजते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले असून या भ्याड हल्ल्याचा केवळ निषेध न करता त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

”काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना विनम्र श्रद्धांजली. त्यांच्या प्रियजनांप्रती सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर आराम पडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अश्या भ्याड हल्ल्यांचा केवळ निषेध केला जाणार नाही तर चोख प्रत्युत्तर देऊन आपल्या सीमांचं आणि नागरिकांचं रक्षण केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.