अंधेरीत आता सीसीटीव्हीचा वॉच

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेतर्फे अंधेरी पूर्व येथील छत्रपती संभाजी महाराज नगर येथे सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. नुकतेच या सीसीटीव्हीचे लोकार्पण करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेने हे महत्त्वाचे पाऊल उचलल्यामुळे स्थानिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी सततच्या होणाऱया तक्रारीची दखल घेत विधानसभा संघटक संदीप नाईक यांच्या वतीने संपूर्ण परिसरात 21 सीसीटीव्ही क@मेरे लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीचे लोकार्पण शिवसेना नेते विभागप्रमुख आमदार अॅड. अनिल परब तसेच शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विधानसभा संघटक रूपाली शिंदे, समन्वयक नितीन डिचोलकर, समन्वयक मंगला शेलार, जुईली शेंडे, उपविभाग प्रमुख समीर साबे, चंद्रकांत पवार, उपविभाग संघटक शुभदा पाटकर, उर्मिला सावंत, शाखाप्रमुख विजय पाटील, अनिल मालप, प्रकाश सकपाळ, सुनील आडीलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन उपशाखाप्रमुख नितेश गुरव, नरेश खोत, रितेश सोलंकी आणि शुभम सकपाळ यांनी केले.