परप्रांतीय रिक्षाचालकांवर तातडीने कारवाई करा! शिवसेनेची विलेपार्ले पोलिसांकडे मागणी 

मुंबईत परप्रांतीय टॅक्सी- रिक्षाचालकांची मुजोरी वाढत चालली असून विलेपार्ले येथे रिक्षाचालकाला जाब विचारणाऱ्या मराठी तरुणाला काही रिक्षाचालकांनी मिळून मारहाण केली. याबाबतचा व्हिडीओ समोर आल्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीला आला. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणणाऱया परप्रांतीय रिक्षाचालकांवर कारवाई करा, अशी मागणी विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी विलेपार्ले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनाक्षी रोहरा यांच्याकडे केली.

विलेपार्लेतील ही एकच घटना समोर आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक मुजोर रिक्षाचालक असून अशा रिक्षाचालकांवर कारवाई करा, अशी मागणी विलेपार्ले विधानसभेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. दरम्यान, मारहाण करणाऱया रिक्षाचालकांना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिले. यावेळी उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार, शाखाप्रमुख अनिल मालप, प्रकाश सकपाळ, सुनील आडेलकर उपस्थित होते.

विलेपार्लेत परप्रांतीय रिक्षा चालकांनी मराठी तरुणाला तुडवले