प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेनेचा भारतमाता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवसेनेचा भारतमाता पूजन आणि संविधान दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. भारतमाता पूजन सोहळा हा दादर येथील शिवसेना भवन येथे होणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील माँसाहेब मीनाताई पुतळ्यापासून दिंडीला सुरुवात होणार आहे. या पूजन व दिंडीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य उपस्थित राहणार आहेत.