![Rahul Solapurkar](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Rahul-Solapurkar-696x447.jpg)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्याविषयी सर्वत्र संताप व्यक्त होत असून, दिसेल तेथे त्याचे तोंड फोड्याऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देण्याची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिनेता राहुल सोलापूरकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेवरून अवमानकारक वक्तव्य केल्याने राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतरही त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत दिशाभूल करणारी मुक्ताफळे उधळल्याने तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
दिसेल तिथे तोंड फोडणार
शरद कोळी यांनी अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध करीत, जिथे दिसेल तेथे त्याचे तोंड फोडून काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच राहुल सोलापूरकरचे तोंडफोडाणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीसही त्यांनी जाहीर केले आहे.