![Shivsena UBT](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/01/Shivsena-UBT-696x447.jpg)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने माहीम आणि अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून त्यासंदर्भात प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.
माहीम विधानसभेत उपविभागप्रमुख पदी सिध्दार्थ चव्हाण (शाखा क्रमांक 191 व 192) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शाखा क्रमांक 192 च्या शाखाप्रमुख पदी प्रवीण नरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अणुशक्तीनगर विधानसभा क्षेत्रात पुढील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. विधानसभा संघटक – निमिष भोसले (शाखा क्रमांक 142, 144, 145, 146) व सुरेश लांडगे (शाखा क्र. 143, 147, 148), उपविभागप्रमुख – रोहिदास ढेरंगे (शाखा क्र. 142, 143), संदीप भोईर (शाखा क्र. 144, 145), अमित शिंदे (शाखा क्र. 146, 147, 148), विधानसभा सहसंघटक – अरूण हुले (शाखा क्र. 142, 143, 144), राजेंद्र पोळ (शाखा क्र. 145, 146), संजय मोरे ( शाखा 147, 148), विधानसभा समन्वयक – तानाजी गुरव (शाखा क्र. 142, 143), उपविभाग समन्वयक – आनंद नलावडे (शाखा क्र. 144, 145), शाखाप्रमुख – सतीश काळगावकर (शाखा क्र. 142), शाखा समन्वयक – बळवंत यादव (शाखा क्र. 143).